शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ही निवडप्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी एम. एच.बनसोडे यांनी निवड जाहीर केली. त्यांना सहायक म्हणून ग्रामसेवक कलाल यांनी काम पाहिले.
याप्रसंगी नूतन सदस्य सूर्यकांत कोळी, राणी पाटील, गुंगाबाई चव्हाण, भौरम्मा बिराजदार, विठ्ठल सोनकांबळे यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला. निवडीनंतर नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील महादेव बिराजदार, श्रीशैल बिराजदार, मलकणा सगर, कल्याणी सगर, चंद्रशा मलाबदे, शिवपुत्र जनगोंडा, हणमंत पाटील, मलेशी पाटील, शिवनिगप्पा कळसगोंडा, चंद्रकांत बिराजदार, शिवबसय्या स्वामी, शंकरेप्पा बिराजदार, राम बिराजदार, गणपती फुलारी, मडेप्पा व्हसाळे, सिद्धाराम सगर, धनराज सगर, शिवानंद कांदे आदी उपस्थित होते.
----
आधी सरपंचपद मग लग्न
नूतन सरपंच बिराजदार यांचे दोन दिवसांनी लग्न आहे. त्यानिमित्ताने त्यांनी शुक्रवारी सकाळी देवकार्य करून त्याच अंगाने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडही झाली. सरपंच लक्ष्मीपुत्र बिराजदार यांच्या रुपाने गावाला प्रथमच उच्चशिक्षित तरुण सरपंच लाभला आहे.
----
फोटो : भोसगे (ता.अक्कलकोट) येथील नूतन सरपंचपदी लक्ष्मीपुत्र बिराजदार तर उपसरपंचपदी सुनंदा नडगेरी यांची निवड जाहीर होताच जल्लोष करताना सदस्य आणि ग्रामस्थ.