शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात गेम पलटला! भाजप ४५, काँग्रेस ४२; जम्मूमध्ये स्थिती जैसे थे
2
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
3
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
4
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
5
अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
6
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
7
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
8
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
9
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
10
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
11
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
12
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
13
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
14
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
15
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
16
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
17
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
18
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
19
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
20
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान

“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 6:24 AM

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत तुम्ही महायुतीला १०६वा आमदार दिल्यानंतर आम्ही राज्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, आंधळगाव (जि. सोलापूर) : ‘देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता, वो डेफिनेटली करता है’ अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी, तामदर्डी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग १६६ पर्यंतच्या जोडणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी समाधान आवताडे, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते आणि राजेंद्र राऊत हे आमदार, तसेच माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत तुम्ही महायुतीला १०६वा आमदार दिल्यानंतर आम्ही राज्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन केले. महायुती सरकारने आणलेली ‘लाडकी बहीण योजना’ हे महाविकास आघाडीचे सरकार आले, तर बंद करेल. विरोधक हे समाजात अराजकता निर्माण करण्याचे काम करत आहेत. 

दरम्यान, मजरेवाडी येथे भंडारा उधळत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न धनगर समाजातील तरुणांनी केला. या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा