शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

राम मंदिराबाबत भाजपकडून फसवणूक : रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 5:05 PM

कायदा करून राम मंदिर उभारता आले असते

ठळक मुद्देरामदास कदम पंढरपूर दौऱ्यावरउद्या उद्धव ठाकरे यांची पंढरपुरात होणार सभापाच लाखाहून अधिक शिवसैनिक पंढरपुरात होणार दाखल

पंढरपूर : गेल्या ३० वर्षांपासून निवडणूक आली की भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातोय़ गत निवडणुकीत या मुद्यावर देशातील जनतेसह हिंदूत्वावादी संघटनांनी भाजपाला पूर्ण बहुमत देत सत्तेत पाठविले़ मात्र त्यानंतरही सरकारने राममंदिराबाबत ठोस पावले उचलली नाहीत़ कायदा करून राम मंदिर उभारता आले असते पण ते केले नाही़ आता निवडणुका येताच त्यांच्याकडून पुन्हा हा मुद्दा पुढे येऊ लागला आहे़ ही चुकीची बाब आहे़ आजपर्यंत त्यांनी याच मुद्दयावर देशाची फसवणूक केली आहे़ अशी टिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.

पंढरपूर येथे २४ डिसेंबर रोजी ‘पहिले मंदिर, फिर सरकार’चा नारा देत शिवसेनेने महासभेचे आयोजन केले आहे़ यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, पदाधिकारी मोठे संख्येने पंढरपुरात दाखल होत आहेत़ पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महासभेचा तयारीचा आढावा घेतला व पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खा़ संजय राऊत, खा़ विनायक राऊत, खा. अनिल देसाई खा. अरविंद सावत, आ़ तानाजी सावंत, प्रा.शिवाजी सावंत, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी संपर्कप्रमुख संजनाताई घाडी, महिला आघाडी  जिल्हाप्रमुख शैला गोडसे, रवी मुळे, महावीर देशमुख, विनोद कदम आदी उपस्थित होते.

पंढरपूरची महासभा ही राज्यातील रेकॉर्डब्रेक सभा होईल, असा विश्वास व्यक्त करीत रामदास कदम म्हणाले, राज्यातील व देशातील जनतेने मोठ्या विश्वासाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाला सत्तेसाठी भरभरून कौल दिला, मात्र सत्ता आल्यानंतर भाजपाने राम मंदिर, कर्जमाफी, दुष्काळ, बेरोजगारी आदी महत्वाच्या मुद्यावर हिंदूत्वादी संघटनांसह शेतकºयांची घोर फसवणूक केली आहे़ आजपर्यंत त्यांनी धर्माच्या नावावर मते मागितली, मात्र राम मंदिर न उभारता स्वत:चा विकास केला़ भाजप सरकार राम मंदिर उभारत नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने देशाच्या अस्मितेचा मुद्दा हाती घेत आयोद्येला जाऊन सर्व हिंदूत्वावादी संघटनांना एकत्रित करीत ‘पहिले मंदिर, फिर सरकार’ चा नारा दिला़ शिवसेनेच्या या घोषणेला देशभरातून पाठिंबा मिळाला आहे.

पंढरीतील महासभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे केवळ राममंदिराचा मु्द्यावर बोलणार असे काही जन बोलत आहेत, मात्र शिवसेना दुष्काळाच्या मुद्यावर मागे राहणार नाही़ आजपर्यंत शिवसेना बेरोजगारांच्या मागे ठामपणे उभे राहिली़ उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे सरकारला शेतकºयाची कर्जमाफी करावी लागली़ हे विसरून चालणार नाही़ पंढरीतील या सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

असा असेल उद्धव ठाकरे यांचा दौराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी १ च्या दरम्यान पंढरपुरात दाखल होतील़ विश्रामगृहावर काही निवडक पदाधिकाºयांच्या चर्चेनंतर दुपारी ३ वाजता सभास्थळी येतील़ प्रारंभी या सभेत वारकºयांचे प्रतिनिधी म्हणून ह़ भ़ प़ जयवंत महाराज बोधले, ह़ भ़ प़ देवव्रत (राणा) महाराज वासकर हे मार्गदर्शन करतील़ त्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी बोलतील़ ठीक ५ वाजता स्वत: उद्धव ठाकरे बोलण्यासाठी उभे  राहतील़ ६ वाजता सभा संपेल़ त्यानंतर ७ वाजता चंद्रभागा आरतीसाठी उद्धव ठाकरे हे चंद्रभागा नदीवरील इस्कान घाटावर पोहोचतील़ तेथे चंद्रभागेची आरती होईल़ तसेच शिवसेनेच्या वतीने चंद्रभागा नदीत हजारो दिवे सोडून चंद्रभागा प्रकाशमय करण्यात येईल़ उद्धव ठाकरे हे चंद्रभागेला नमस्कार करून राम मंदिर व्हावे, असा आशीर्वाद घेतील. 

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Kadamरामदास कदमRam Mandirराम मंदिरBJPभाजपा