पंढरपूर : दिल्लीतील शरद पवार यांच्या घराची सुरक्षा काढल्यावरून केंद्राचे सूडाचे राजकारण सुरु असल्याची केली टीका कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी केली.
पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी व्यापक बैठक घेण्यात येईल असेही वळसे-पाटील यांनी आज येथे सांगितले. दिलीप वळसे-पाटील यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार भारत भालके यांनी पंढरपूर विकासाच्या अनुषंगाने मुद्दे मांडले. त्यावेळी पालकमंत्री वळसे-पाटील यांनी बैठक घेतली जाईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, माजी आमदार दीपक-आबा साळुंखे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे आदी उपस्थित होते तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून आत्तापर्यंत झालेली कामे, आगामी करावयाची कामे याबाबत सर्वंकष चर्चा केली जाईल. पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यास जास्तीत-जास्त सुविधा देण्याच्या अनुषंगाने विचार केला जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले आमदार भारत भालके यांनी पंढरपुरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पंढरपूरच्या विविध प्रलंबित कामांना गती देण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, असे सांगितले. तत्पूर्वी, पालकमंत्री वळसे- पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक आबा साळुंखे उपस्थित होते तत्पूर्वी, शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आनळे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी पालकमंत्री वळसे- पाटील यांचे स्वागत केले.