आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : निवडणुकीत भाजपा नेत्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती़ प्रचारसभेत आश्वासनांचा पाऊस पडायचा़ आता सत्तेत आल्यावर त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे़ मूळ प्रश्न बाजूला ठेवून नवीन विषय चर्चेला आणले जात आहेत़, अशी टीका क ाँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बसवनगर (ता़ दक्षिण सोलापूर) येथे बोलताना केली़बसवनगर (तेरामैल) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच जगदेवी देशमुख आणि सदस्यांचा सत्कार आ़ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी त्या बोलत होत्या़ अध्यक्षस्थानी माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे होते़ दक्षिण सोलापूर तालुका एनएसयुआयच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती़ भाजपा सरकारच्या धोरणावर चौफेर हल्ला करताना आ़ प्रणिती शिंदे म्हणाल्या, नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली़ बेरोजगारी वाढली़ लघुउद्योग बंद पडले़ विदेशातील गुंतवणूक वाढली नाही़ सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले़ जनतेसाठी आता आपली चूक कळून आली आहे़ त्यांच्याच पक्षाचे मंत्री गिरीश बापट येणाºया निवडणुकीत सत्तेतून पायउतार होईल याची कबुली देत आहेत़ कार्यक्रमास नांदणीचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे, अनंत म्हेत्रे, उपसरपंच रुक्मिणी राठोड, शांताबाई पवार, विलास राठोड, वाघेश म्हेत्रे, सिद्धाराम देशमुख, गेनसिद्ध शेंडगे, आनंद देशमुख,पल्लेश राठोड उपस्थित होते़
भाजपा सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडलाय, आमदार प्रणिती शिंदे यांची भाजप सरकारवर टिका, बसवनगर येथे नव्या लोकप्रतिनिधींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:32 PM
निवडणुकीत भाजपा नेत्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती़ प्रचारसभेत आश्वासनांचा पाऊस पडायचा़ आता सत्तेत आल्यावर त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे़ मूळ प्रश्न बाजूला ठेवून नवीन विषय चर्चेला आणले जात आहेत़
ठळक मुद्देभाजपा सरकारच्या धोरणावर चौफेर हल्ला : आ़ प्रणिती शिंदे नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली़ बेरोजगारी वाढली़ लघुउद्योग बंद पडले़ विदेशातील गुंतवणूक वाढली नाही़ : आ़ प्रणिती शिंदे सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले़ जनतेसाठी आता आपली चूक कळून आली : आ़ प्रणिती शिंदे