शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

'भाजप सरकार हाय हाय ; पुढच्या वर्षी बाय बाय', सोलापूरात राष्ट्रवादीचा भाजप विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 1:07 PM

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बुधवारी  सकाळी शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली गणपती घाटावरील दशक्रियाविधीच्या ठिकाणी भाजप सरकारच्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून पिंडदान करण्यात आले.

ठळक मुद्देभाजप सरकारच्या तीन वर्षाच्या सुमार कामगिरीच्या विरोधात तीव्र निदर्शनेगणपती घाटावर घातले सरकारच्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध आणि पिंडदानभाजपचे तीन साल महाराष्ट्र बेहाल "च्या घोषणांनी गणपती घाट परिसर दणाणला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ :  सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने बुधवारी  सकाळी शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली गणपती घाटावरील दशक्रियाविधीच्या ठिकाणी भाजप सरकारच्या नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालून पिंडदान करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी मुंडन करून भाजप सरकारच्या तीन वर्षाच्या सुमार कामगिरीच्या विरोधात निदर्शनेहि करण्यात आली.   ३० आॅक्टोबरला राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली . त्यामुळे ३० तारखेपासून ८ नोव्हेंबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे . ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीला एक वर्ष होत आहे. सरकारच्या या निर्णयाचे अपयश ठळकपणे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालण्यात येत आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादीच्यावतीनेसुद्धा  पिंडदान करून श्राद्ध घालण्यात आले़ नोटांचे छायाचित्र असलेल्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच मुंडणही करण्यात आले.मृत्यूनंतर ज्या गणपती घाटावर पिंडदानाचा विधी उरकला जातो त्या दशक्रिया विधीच्या ठिकाणीच सोलापूर राष्ट्रवादीने आंदोलन करून सरकारच्या कामगिरीचा निषेध नोंदविला. याप्रसंगी माजी महापौर मनोहर सपाटे,जनार्दन कारमपूरी,माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी गटनेते पद्माकर काळे, परिवहन सभापती राजन जाधव,सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार,अल्पसंख्याक अध्यक्ष राजू कुरेशी,नगरसेविका सुनीता रोटे,मनीषा नलावडे,सुनंदा साळूखे,विठ्ठलसा चव्हाण,जनार्दन बोराडे,प्रशांत बाबर,आनंद मुस्तारे,जावेद खैरदी,महेश कुलकर्णी,युवराज राठोड,ओंकार हजारे,शाम  गांगर्डे यांच्यासह शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.