आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : शेतकरी बांधवांना कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव मिळावे, यासाठी कॉंग्रेस पक्षाचा सतत प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी कॉंग्रेससह सरकार विरोधी सर्व पक्षांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली. १ जूनरोजी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरु केला आहे. या संपाला पहिल्या दिवसापासून आपला पाठींबा होता. अल्पभूधारक शेतकऱ्यांना १ आॅक्टोंबरपर्यंत कर्जमाफी देणार असल्याची घोषणा केली जात आहे. मग, कर्जमाफी करायचीच असेल तर त्यासाठी मुर्हूत कशाला हवा असा प्रश्नही आ. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.भाजप सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ सुरु केलाय. शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही अत्यंत दुदैर्वी बाब आहे. कॉग्रेस सरकारच्या काळात असे कधीही घडले नव्हते. भाजपाचे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या हालअपेष्ठा सुरु झाल्यात सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता तात्काळ कर्जमाफी द्यावी. अन्यथा सुरु असणारे आंदोलन अधिक तीव्र करु, अशी तंबीही आ. प्रणिती शिंदे यांनी सरकारला दिली.भाजप सरकारकडून शेतकऱ्यांंच्या शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत नाही. कर्जमाफी नाही. सत्तेच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांंना निवडणूकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले. परंतु सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर यांचा आजही अभ्यासच सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्यामुळे त्यांची कुटूंबे रस्त्यावर येत आहेत. तरीदेखील या सरकारला काहीच वेदना होत नाहीत. ही अत्यंत खेदाची बाब आहे.
कर्जमाफीसाठी आॅक्टोबरचा मुर्हुत कशाला, आ़ प्रणिती शिंदे यांचा भाजप सरकारला सवाल
By admin | Published: June 08, 2017 3:22 PM