घरी वीज बील माफीसासाठी मोहोळमध्ये भाजपाचे आंदोलन
मोहोळ : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जनता आधीच अडचणीत असताना महावितरणने ७५ लाख वीजग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून चार कोटी जनतेला अंधारात लोटण्याचे कृत्य केल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुका भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
मोहोळ येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने लॉकडाऊन कालावधीतील वाढीव घरगुती वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी ५ फेब्रुवारी रोजी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, नेते संजय क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पवार, नगरसेवक सुशील क्षीरसागर, अनुसूचित जातीचे प्रदेश सचिव संजीव खिल्लारे, उद्योग आघाडी जिल्हा संयोजक लिंगराज निकम, शंकरराव वाघमारे, विष्णू चव्हाण, मुजीब मुजावर, संतोष नामदे, भारत आवारे, महादेव पाटील, युवराज शिंदे, भाऊ सोनटक्के, नवनाथ चव्हाण, जगन्नाथ वसेकर, विकास वाघमारे, रमेश भानवसे, सागर लेंगरे, संतोष माळी, गणेश झाडे, गुरुराज तागडे, सागर वाघमारे, दिनेश गडदे, अमोल चोरगे, काशीम मुल्ला, अतिक मुजावर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
----- ०५मोहोळ-बीजेपी आंदोलन
मोहोळ भाजपच्या वतीने वीजबिल माफीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर ‘टाळे ठोको’ आंदोलन छेडताना पदाधिकारी, कार्यकर्ते.
फोटो: