शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपाची उडी; कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना भाजपचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2021 9:15 PM

सोलापूर लोकमत नेटवर्क

मंगळवेढा : संपूर्ण महाराष्ट्र घरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे,  एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे हे महत्त्वाची मागणी घेऊन हा संप सुरू आहे . मंगळवेढा बसस्थानकामध्ये देखील आज कर्मचाऱ्यांच्या या संपाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण पाठिंबा देऊन या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.

सध्या महाराष्ट्रभर मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या 33 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्य कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणार प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे म्हणत, भाजपने महाराष्ट्र मध्ये या संपाला पाठिंबा दिला आहे . मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांनी आंदोलनास बसलेल्या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची सर्व मागणी रास्त असून त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. कोणावरही कारवाई चे दमदाटी करत असेल तर त्यांना असा करण्याचा अधिकार नाही, तसे कोणाबाबत होत असेल तर तसे होऊ देणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

 भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी यावेळी भेट घेतली व आगार प्रमुखांना या संपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी प्रामुख्याने धरणे आंदोलनाला बसत कोणत्याही दबावाला  बळी न पडता कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहील व त्याला भाजपचा पाठिंबा असेल असे मत व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथ अवताडे यांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.  युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव यांनी राज्य सरकारवर टीका केली व या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याकरिता या लढ्यासोबत असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाढदेकर, तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, दामाजी शुगर संचालक लक्ष्मण जगताप, सहकार विभाग संयोजक सत्यजित सुरवसे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष नागेश डोंगरे,  शहराध्यक्ष सुशांत हजारे , शहर सरचिटणीस अजित लेंडवे, शहर उपाध्यक्ष सुजित निकम, ज्ञानेश्वर काशीद, रोहित हिरेमठ, किसान मोर्चा सरचिटणीस विजय बुरकुल, जेष्ठ नेते अशोक माळी, सुरेश जोशी तसेच एसटी कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपा