मोहोळ : येथे समर्थ बूथ अभियानांतर्गत कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात मोहोळ तालुका भाजपाचे पदाधिकारी निवडले गेले. या अभियानात मोहोळ विधानसभा अध्यक्षपदी मोहोळचे दिलीप रंगनाथ गायकवाड, नामदेव काळे, वडाळ्याचे चिमणदादा साठे, मुजीब मुजावर जयराम गुंड यांची वेगवेगळ्या पदावर निवडी करण्यात आल्या.
याप्रसंग माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, नगरसेवक सुशील क्षीरसागर, बाळासाहेब पवार, संजय क्षीरसागर, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, तालुका सरचिटणीस रमेश माने, महेश सोवनी, सतीश पाटील, माजी सभापती समता गावडे, पंचायत समिती सदस्या डॉ. प्रतिभा व्यवहारे, गणेश झाडे, विष्णुपंत चव्हाण, विशाल डोंगरे, संतोष नामदे, अविनाश पांढरे, तानाजीराजे बनसोडे, माऊली भगरे, दीपक गवळी, रणजीत चवरे, नवनाथ गाढवे, औदुंबर वाघमोडे, संजय वाघमोडे, शशिकांत गावडे, शहाजहान बागवान, संजय वाघमोडे, भारत आवारे, जगन्नाथ वसेकर, नवनाथ चव्हाण, दीपक पुजारी आदी उपस्थित होते.
---
फोटो १३ मोहोळ
भाजपच्या समर्थ बूथ अभियान कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख.