अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अकलूज पोलिसांनी पकडून जेरबंद केले असताना आज गुरुवारी दुसऱ्या दिवशी आणखी तिघेजण रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याचे अकलूज पोलीस ठाण्याचे पो.नि. अरुण सुगावकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खबरीवरून त्यांनी पोलीस पथकासह औषध निरीक्षक नामदेव भालेराव व दोन पंचासह सापळा रचून बनावट ग्राहक पाठविले. यावेळी योगेश दिलीप शिंदे (वय २७), सागर संजय थोरात (वय २७, दोघेही रा. अकलूज) हे जुन्या एस.टी. स्टॅन्डजवळ ४५ हजार रुपयांना तर जानीसार मिराज मुलाणी (वय ३०, रा. राऊतनगर-अकलूज) हा राऊतनगर येथील मंगल कार्यालयाच्या गेटजवळ ४० हजार रुपयांना इंजेक्शन विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले.
औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, मसपोनि सारिका शिंदे, एएसआय बबन साळुंखे, बाळासाहेब पानसरे, श्रीकांत निकम, पोअं. रामचंद्र चौधरी, सुहास क्षीरसागर, विक्रम घाटगे, मंगेश पवार, विशाल घाटगे, जमीर शेख, विश्वास शिनगारे, अमोल मिरगणे, नीलेश काशिद, अमितकुमार यादव, सुभाष गोरे, संदेश रोकडे, प्रवीण हिंगणगावकर, पांडुरंग जाधव, नाजनीन तांबोळी यांच्या पथकाने केली. पुढील तपास पो.नि. अरुण सुगावकर करीत आहेत.