शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

अंध-अपंगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस सोलापूरात प्रारंभ, सांगलीची विजयी सलामी

By admin | Published: April 21, 2017 2:45 PM

.

आप्पासाहेब पाटील : आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : सोलापूरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू झालेल्या अंध-अपंगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाचा पराभव करीत सांगली संघाने ८८ धावांनी विजय संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी सलामी दिली़ या सामन्याचा सामनावीर अजिनाथ घोडके हा ठरला़ जैन सोशल गु्रप, सोलापूर व मफतलाल इंडस्ट्रीज लि यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर अंध व अपंगाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन सहकारमंत्री सुभाष देशमुख व महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लार्इंड, मुंबईचे अध्यक्ष रमाकांत साटम, मफतलाल इंडस्ट्रीजचे मार्केटिंग अध्यक्ष एम़ बी़ रघुनाथ, एमआरसीचे चेअरमन प्रविण चोपडा, उद्योगपती गणेश छल्लाणी, दिपक आहेरकर, प्रकाशचंद डाकलिया, किरण पवार, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेविका संगिता जाधव, श्रीनिवास करली, नागेश वल्याळ, प्रोग्राम चेअरमन परिमल भंडारी, रमेश डाकलिया, अमित कवाड, जैन सोशल ग्र्रुपचे संजय सेठिया, चेतन सुराणा, अभय गांधी, पिंकी कवाड, अंध, अपंग प्रगती सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश दर्शनाळे, प्रभाकर कदम, राजू शेळके, राजेश दमाणी, अंकित दमाणी आदी मान्यवर उपस्थित होते़ प्रारंभी प्रारंभी सातारा व सांगली संघात सामना खेळविला गेला़ यात सातारा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला़ सांगली संघाने ८ षटकात दोन बाद १३६ धावा केल्या़ या धावाचा पाठलाग करताना सांगली संघ दोन बाद ४८ एवढे रन काढू शकले़ त्यामुळे सांगली संघ ८८ धावांनी विजयी झाला़ सांगली संघाकडून अविनाश घोडके नाबाद ५६ तर सुरज जाधव या खेळाडूंनी नाबाद ४० धावा केल्या़ अविनाश घोडके यांनी नाबाद ५६ धावा काढून १ विकेट घेतल्याबद्दल त्यास सामनावीर घोषित करण्यात आले़ दुसरा सामना हा लातूर व सोलापूर यांच्यात खेळविण्यात आला़ या सामन्यांसाठी गणेश छल्लाणी, श्री हिराचंद नेमचंद जैन मंगल कार्यालय, सोलापूर, जैन सोशल गु्रप संगिनी फोरम, सोलापूऱ जैन सोशल गु्रप युवा फोरम, सोलापूर यांच्यासह ललितकुमार वैद, चेतन संघवी, उन्मेश करनावट, भद्रेश शहा, प्रविण भंडारी, हर्षल कोठारी, रमेश डाकलिया, राजेश शहा, वंदना शहा, विनोद सेठिया, किरीट शहा, संदीप वेद, भव्या शहा, रितेश मेहता, परिमल भंडारी, महिपाल ओसवाल, भैरू संकलेचा, प्रेरणा बददोटा, योगेश मेहता, शिखा बंब, नंदकिशोर शहा, बाबुभाई मेहता, संजीव पाटील, मनमोहन वेद, सुनिल छाजेड हे परिश्रम घेत आहेत़ ------------------------------------या स्पर्धेत सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, औरंगाबाद, कोल्हापूर या ८ संघानी सहभाग नोंदविला आहे़ या स्पर्धेचे प्रथम परितोषिक ११ हजार व चषक तर व्दितीय परितोषिक ७ हजार व चषक असे आहे़२१ व २२ एप्रिल या दोन दिवसात सात सामने खेळविण्यात येणार आहेत़ सामने बाद पध्दतीने खेळविले जात आहेत़ म्युझिकल बॉलचा यामध्ये वापर करण्यात येत आहे़