भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व भाजप तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयापासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. विद्युत महामंडळाच्या कार्यालयापर्यंत चालत जाऊन कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
यावेळी श्रीकांत देशमुख यांनी आघाडी सरकारने मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. ती नाही मिळाली, मात्र वीज कनेक्शन तोडण्याची भाषा केली जात आहे. जनतेकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वीज कार्यालयास ‘टाळे ठोक आंदोलन’ करण्यात आल्याचे सांगितले. हे सरकार कुठलाही जनाधार नसलेले सरकार आहे, वीजबिल माफ करावे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा योगेश बोबडे यांनी दिला. यावेळी मदन मुंगळे, विठ्ठल मस्के यांचीही भाषणे झाली.
यावेळी भाजपचे गोविंद कुलकर्णी, रत्नाकर कुलकर्णी, भाऊ महाडिक, विठ्ठल मस्के, गिरीश ताबे, राजाभाऊ खटके, नागनाथ वाघे, परमेश्वर खरात, जयवंत पोळ, औदुंबर भागवत, बाळासाहेब ढगे, सागर ढवळे, दत्ता ढवळे, अमर शेंडे, सुभाष इंदलकर, राहुल चव्हाण, नारायण गायकवाड, मगन महाडिक, विजय कोकाटे, विजय महासागर, करण भगत, धनश्री खटके, शोभा खटके, वृंदावनी खटके, राणी खटके, मनीषा खटके, शेशाबाई मस्के, नयना कांबळे, अनिता कांबळे, अनिता लोंढे, तनुजा तांबोळी, सुरेखा इंदलकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : ०५टेंभुर्णी-आंदोलन
टेंभुर्णी येथे विद्युत महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनासाठी एकत्र आलेले भाजप व मित्रपक्षांचे कार्यकर्ते.