सोलापूर - मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील भाळवणी ते भिगवण दरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत रेल्वेचा ब्लॉक असणार आहे. यामुळे सोलापूर विभाागातून धावणारी हुतात्मा, विशाखापट्टणमसह इतर चार गाड्या वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्यात आल्या असून इतर चार गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
सोलापूर विभागातील भाळवणी-भिगवण सिंगल लाइन सेक्शनमध्ये दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रशासनाने इंजिनियरिंग ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सोलापूर ते पुणे व पुणे ते सोलापूर ही १२, १५, १९, २२, २६, २९ व ३१ मार्च रोजी धावणार नाही. पनवेल-नांदेड विशेष एक्सप्रेस ही गाडी १५ मार्च व १ एप्रिल, नांदेड-पनवेल ही गाडी १४, ३१ मार्च रोजी धावणार नाही. याशिवाय विशखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष एक्सप्रेस ही १२, ३० मार्च रोजी धावणार नाही. लोकमान्य टिळक टर्मिनल- विशखापट्टनम विशेष एक्सप्रेस ही गाउी १४ मार्च व १ एप्रिल रोजी धावणार नाही. तरी सर्व प्रवाशांनी रद्द झालेल्या व मार्गात बदल झालेल्या गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करावा असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी केले आहे.
मार्गात बदल केलेल्या गाड्या....
- - मुंबई-नागरकॉईल विशेष एक्सप्रेस ही एक्सप्रेस १३, १६, १७, १८, २०, २३, २५, २७, ३० व ३१ मार्च रोजी ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगलुरू जंक्शन, शोरणूर, ईरोड, करूर मार्गाने धावणार आहे.
- - नागरकॉईल- मुंबई विशेष एक्सप्रेस ही गाडी १२, १५, १६, १७, १९, २२, २३, २४, २६, २९, ३० व ३१ मार्च राेजी करूर, ईरोड, शोरणूर, मंगलुरू जंक्शन, मडगाव, रत्नागिरी, पनवेल, ठाणे, मार्गाने धावणार आहे.
- - मुंबई-नागरकॉईल विशेष एक्सप्रेस ही गाडी १२, १५, १९, २२, २६, २९ मार्च रोजी ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगलुरू जंक्शन, शोरणूर, ईरोड, तिरूच्चिराप्पाल्लि मार्गाने धावणार आहे.
- - नागरकॉईल- मुंबई विशेष एक्सप्रेस ही गाडी १४, १८, २१, २५, २८ मार्च रोजी तिरूच्चिराप्पाल्लि, ईरोड, शोरणूर, मंगलुरू जंक्शन, मडगाव, रत्नागिरी, पनवेल, ठाणे, मार्गाने धावणार आहे.