याचे उद् घाटन ज्येष्ठ नागरिक नाना गाडे व हनुमंत वायकुळे यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबिरास दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर बार्शी न्यायालयाचे न्यायाधीश तेजवंतसिंग संधू यांनी भेट देऊन स्वतः रक्तदान केले.
या शिबिरास दिवसभर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहायक पोलीस निरीक्षक निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, ॲड. बी. एन. चव्हाण, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्षा ॲड. राजश्री डमरे, संजय पाटील, शिवाजी शिक्षण मंडळाचे संचालक प्रा. डॉ. दिलीप मोहिते, प्रा. संजय पाटील, प्रा. मोरे, गणेश भोळे यांनी भेटी दिल्या. या शिबिरासाठी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुशांत चव्हाण, महोत्सवाचे अध्यक्ष अभिजीत हांडे, उपाध्यक्ष मोहित मस्तूद, सचिव सदानंद गरड, खजिनदार शंकर चव्हाण यांनी परिश्रम घेतले. यावेळी संदीप मिरगणे व प्रज्ञा मिरगणे हे पती-पत्नी, अमृता शिंदे, सारिका गाडे व प्रतिभा गाडे या महिलांनी रक्तदान केल्याबद्दल प्रतिष्ठानने त्यांचा सन्मान केला.