कोरोना व लाॅकडाऊनमुळे सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे माजी सहकार राज्यमंत्री स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आज अकलूज येथे झालेल्या शिबिरात १६६ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँकेचे चेअरमन सतीश पालकर, जनसेवा संघटनेचे रणजितसिंह देशमुख, राजाभाऊ गुळवे, मुबारक कोरबू, सुधीर रास्ते, नवनाथ साठे, रघुनाथ साठे, सागर खंडागळे, मंगेश साठे, ज्योती कुंभार, विजय गायकवाड, शशी भोसले, गौरव एकतपुरे, बापू एकतपुरे, मयुर माने, ओंकार साने, विजय खंडागळे, भीमराव भुसनर, किरण गिरमे, बबनराव शेंडगे, गणेश महाडिक-पाटील, वैभव गायकवाड, महेश शिंदे, हुसेन शेख, मोहसीन बागवान, इब्राहिम बागवान, दीपक सुत्रावे, हनीफ शेख, फिरोज देशमुख, राहुल ढेरे, आदेश गोसावी, संजय गाडे, चंद्रकांत गायकवाड, सुनील जठार, सुनील भगत, जावेद तांबोळी, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
यासाठी विश्वप्रताप गायकवाड, सरदार तांबोळी, सुनील गुजर, सोमनाथ बिटे, इब्राहिम मुलाणी यांच्यासह जनसेवा संघटनेचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी ::::::::::::
रक्तदान शिबिराच्या उदघाटनप्रसंगी डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, सतीश पालकर, गणेश महाडिक, रणजित देशमुख, सुधीर रास्ते, राजू गुळवे, ज्योती कुंभार व कार्यकर्ते.