याचे उद्घाटन सोलापूर झोनचे प्रमुख प. पू. इंद्रपाल सिंह नागपाल महाराज, माजी आमदार नारायण पाटील, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे चेअरमन गणेश करे-पाटील, कमलाई साखर कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे, प्राचार्य किसनराव धुमाळ, विश्वसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जयराज कांबळे, वैद्यकीय अधिकारी राहुल कोळेकर, जि. प. सदस्या राणी वारे, नगरपालिका सभापती स्वाती फंड, रासपचे तालुकाध्यक्ष अंगद देवकते, बाळासो टकले, शंभूराजे जगताप, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अतुल वारे, नामदेव काळे, प्रचारक अनिल पवार, डी. एच. सिंधी उपस्थित होते.
करमाळा शाखेने एकूण ४ हजार ३०४ युनिट रक्तसंकलन केले आहे. रक्तसंकलन रामभाई शहा रक्तपेढी बार्शी व गोपाबाई दमाणी ब्लड बँक सोलापूर यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल शिंदे यांनी केले तर आभार शाखाप्रमुख पोपट थोरात यांनी व्यक्त केले.
फोटो
१०करमाळा-रक्तदान
ओळी
करमाळयात संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबीर करताना रक्तदाते व मान्यवर.