कुरुल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून कोरवली ग्रामपंचायतीचे आरोग्य समितीचे सदस्य महासिद्ध वाले यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले.
कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पंडित शेटे, सुरेश म्हमाणे, डॉ.अमोल पाटील, सिद्धाराम म्हमाणे उपस्थित होते. यावेळी कोरवली आणि हराळवाडी येथील रक्तदात्यांनी रक्तदान केले. गणेश माडकर, दत्तात्रय मुरगुंडे, गणेश बोराळे सावकार, कैलास आयवळे, नितीन म्हमाणे, नागेश म्हमाणे, केदार मलाडे, गुरुनाथ पवार, सागर म्हमाणे, सिद्धलिंग कोळी, मनोहर कांबळे, मौलाली शेख, करीम शेख, आकाश मंजुळे, स्वप्निल कांबळे, दत्तात्रय मुरगुंडे, लहू म्हमाणे, चिदानंद म्हमाणे, सुनील लटके यांनी या शिबिरात योगदान देत पुढाकार घेतला. या शिबिरासाठी अष्टविनायक मंडळाचे बाळासाहेब कोळी, भय्यासाहेब वाळे, मल्लिनाथ म्हमाणे, अमोगसिद्ध कोळी, सुनील लटके, करीम शेख यांनी परिश्रम घेतले.