शासकीय नियम पाळत विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. साम्राज्य आरमारतर्फे आयोजित शिबिरात ६४० जणांनी रक्तदान केले. यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
तसेच नगरपरिषद, पंचायत
समिती, पोलीस ठाणे, उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिवस्मारक मंडळ, शिवराय
ज्वेलर्स, मावळा प्रतिष्ठान, रणशौर्य ग्रुप, ओजी ग्रुप,
मौलाना आझाद यंग पार्टी चेक नाका, तिरंगा ग्रुप व टिपू सुलतान ग्रुप
यांच्यासह इतर संघटनांंच्याही वतीने शिवजयंती साजरी केली. शिवराय ज्वेलर्सच्या बाबाराजे बागल यांच्या वतीने शहरातल्या सर्व कोरोना योद्धांचा सन्मान केला. मौलाना आझाद यंग पार्टी चेक नाका यांच्यावतीने उम्मीदच्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आला व शहरात सरबत वाटप करण्यात आले.
शहरात यंदा प्रथमच शिवजयंती उत्सवातला डॉल्बी व मिरवणुकीवरचा लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे.