याप्रसंगी कुर्डुवाडी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी सरपंच प्रतिनिधी दीपक ताकतोडे, उपसरपंच वसंत इंगळे, पांडुरंग राऊत, माजी उपसरपंच काकासाहेब पाटील, जि प सदस्य भारत शिंदे, दीनानाथ घाडगे, महादेव घाडगे, यशवंत शिंदे, हरिदास रणदिवे, शिवाजी टोनपे, सावता वाघमारे, विनायक गाजरे, आनंद कुलकर्णी, पांडुरंग घाडगे होते. यावेळी सभापती विक्रम शिंदे यांनी अरण ग्रामपंचायतसाठी अडीच लाख रुपयांचा आरो फिल्टर देण्याची घोषणाही केली. यासाठी सोलापूर येथील अक्षय ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य यशवंत शिंदे, आनंद कुलकर्णी, संजय शिंदे, संदीप पाटील, यशवंत पाटील, बाबासाहेब शेळके, सावता घाडगे, संतोष कोरडे, सतीश घाडगे, दीपक गिड्डे, नवनाथ कांबळे यांनी परिश्रम घेतले.
---
फोटो : २३ मोडनिंब
अरण येथे हरिभाऊ नाना शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने रक्तदान शिबिराच्या वेळी यशवंत शिंदे, आनंद कुलकर्णी,संजय शिंंदे, बालाजी टोणपेे आदी.