नरखेड : मोहोळ तालुक्यात नरखेड येथील नवोदय सामाजिक विचार मंचच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन डॉ. अमोल पाटील, डॉ. उमेश मेंडगुळे यांच्या हस्ते झाले. सांगोला येथील रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले. वैद्यकीय पोलीस, प्रशाशक, पत्रकार, आशा सेविका यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. उमेश मेंडगुळे, डॉ. अमोल पाटील, ॲड. गोविंद पाटील, पोलीस गणेश पोफळे, मुख्याध्यापक शालिनी कोरवले, प्रदीप पाटील, सुधाकर काशीद, ग्रामसेवक तात्यासाहेब नाईकनवरे, बाळासाहेब चौधरी, दिलीप मोटे, शहाजी जगताप, राहुल कसबे, विस्तार अधिकारी महेश भोरे, सचिन शिंदे, हणमंत राऊत, बाळासाहेब गरड, धर्मराज चवरे, शहाजी माने, हणमंत पवार, अमोल धोत्रे, दयानंद भोरे, ज्ञानेश्वर गुंड, ऋषभ नरळे, शौकत शेख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद भोरे यांनी, तर प्रास्ताविक सुधाकर काशीद यांनी केले. आभार शंकर मोटे यांनी मानले.