मोहोळ येथील कै. शहाजीराव पाटील बहुउद्देशीय सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे.सोलापूर येथील अश्विनी ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबीर पार पडणार आहे. शहरातील व तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, शासन-प्रशासन यांच्या वतीने या शिबिराला योगदान मिळणार आहे.
या शिबिरामुळे सर्वसामान्य रुग्णाला कोरोना महामारीच्या काळात मोठी मदत होणार आहे. ही गरज लक्षात घेता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये शेकडो रक्तदाते सहभागी होणार आहेत. शहरातील व तालुक्यातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी वर्गानेही सर्व कर्मचारी वर्गाला या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
---
मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
मोहोळ तालुक्यातील जनतेने युवा वर्गाने आजवर नेहमीच लोकमतच्या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे. या कोरोना काळात देखील सामाजिक बांधिलकी म्हणून तरुण मंडळ व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.