शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

आधुनिकीकरणाचा फटका; सोलापुरातील ब्रिटिशकालीन यंत्रमागाची भंगारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:53 AM

शटललेस यंत्रमागावर उत्पादन सुरू; काही उद्योजक यंत्रमाग उद्योगातून बाहेर पडताहेत

ठळक मुद्देब्रिटिशकालीन यंत्रमाग हे १८९० सालापासूनचे आहेत़ हे यंत्रमाग प्लाट व बटर कंपनीचे होते़यंत्रमागांवर सोलापुरातील बहुतांश उद्योजकांनी गेली अनेक वर्षे चादर आणि टॉवेलचे उत्पादन घेतले़मागील वर्षभरापासून तब्बल सातशे ते आठशे जुने यंत्रमाग भंगारात विकले गेले आहे

बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योगात आधुनिकीकरणाचे वारे जोरात वाहताहेत़ब्रिटिशकालीन यंत्रमाग कालबाह्य होत आहेत़ काही यंत्रमाग खराब झाले असून, काहींनी रॅपिअर अर्थात शटललेस यंत्रमागावर उत्पादन सुरू केले़ तसेच काही उद्योजक यंत्रमाग उद्योगातून बाहेर पडताहेत़ या सर्वांचा परिणाम जुने ब्रिटिशकालीन यंत्रमाग भंगारात विकण्याचे प्रमाण वाढले आहे.

मागील पाच ते सहा वर्षांत तब्बल सहा हजार ब्रिटिशकालीन यंत्रमाग भंगारात विकल्याची माहिती सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली़ सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला ब्रिटिशकालापासून एक उज्ज्वल असा इतिहास आहे़ ब्रिटिशकालातील मिलमध्ये ब्रिटिश कंपनीतील अधिकाºयांनी बनवलेल्या पॉवरलूमवर कापड उत्पादन होत होते़ स्वातंत्र्यानंतरही त्याच यंत्रमागावर कापड उत्पादन सुरू राहिले़ कालांतराने मिल बंद पडल्या.

मिलमधील जुन्या यंत्रमागात काहीसे बदल करत सोलापुरातील उत्पादकांनी त्याच यंत्रमागावर चादरीचे उत्पादन सुरू केले़ चादरी सोबत टॉवेलचेही उत्पादन मागील पंचवीस ते तीस वर्षांपासून सुरु होतेआता जुने यंत्रमाग कालबाह्य होत आहेत़ उत्पादनाची क्षमता खूप कमी झाली़ ब्रिटिशकालीन यंत्रमागाचा स्पीड प्रतितास शंभर मीटर असून याउलट रॅपिअरचा स्पीड प्रतितास चारशे मीटर इतका आहे़ त्यामुळे रॅपिअर लुमचीही क्रेझ वाढू लागली़ सोलापुरातील ४० टक्के यंत्रमाग उद्योजकांनी रॅपिअर लूमचा वापर सुरू केला आहे़ त्यामुळे  त्यांच्याकडील ब्रिटिशकालीन यंत्रमाग ते दुसºया उद्योजकांना विकताहेत़ या उद्योगात काही वर्षांपासून मंदी सुरू आहे़ त्यामुळे जुन्या यंत्रमागांना खरेदी करण्याचे प्रमाण देखील कमी झाले़ आधुनिकीकरण करणाºया उद्योजकांना जुने यंत्रमाग विकण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही़ ब्रिटिशकालीन यंत्रमाग तब्बल एक हजार किलो वजनाचे आहेत़ त्यामुळे भंगारात त्यांना चांगला भाव मिळतोय़ जुने यंत्रमाग खरेदी करून त्यावर उत्पादन घेण्याचे धाडस कोणी करेना़. 

ब्रिटिशकालीन यंत्रमाग हे १८९० सालापासूनचे आहेत़ हे यंत्रमाग प्लाट व बटर कंपनीचे होते़ याच यंत्रमागांवर सोलापुरातील बहुतांश उद्योजकांनी गेली अनेक वर्षे चादर आणि टॉवेलचे उत्पादन घेतले़ आता हे जुने यंत्रमाग काम करेनात़ त्यात वारंवार दुरुस्त्या निघताहेत़ मागील वर्षभरापासून तब्बल सातशे ते आठशे जुने यंत्रमाग भंगारात विकले गेले आहे़ तर अजूनही काही उद्योजकांकडे ब्रिटिशकालीन यंत्रमाग पडून आहेत़ अजूनही सोलापुरात एक हजारांहून अधिक ब्रिटिशकालीन यंत्रमाग कार्यरत आहेत़ बहुतांश उद्योजकांनी आधुनिकीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे़ त्यामुळे पुढील वर्षभरात सर्व जुने यंत्रमाग कालबाह्य होतील़ - पेंटप्पा गड्डम अध्यक्ष, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ, सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योग