बार्शी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळांतर्गत १६० निवृत्त कर्मचारी आणि ७२ कायम सेवेतील कर्मचारी येतात. बार्शी नगरपालिका अ वर्ग असल्याने २० टक्के नगरपालिका आणि ८० टक्के शासन, असा निवृत्तीवेतन आणि पगाराचा वित्तीय आकृती बंध आहे. बार्शी नगरपालिकेकडून दरमहा शिक्षणमंडळाला १७ लाख रुपये रक्कम देय आहे; परंतु गेल्या १८ महिन्यांपासून शिक्षण मंडळाला सुमारे ३ कोटी ६ लाख रुपये बार्शी नगरपालिकेकडून येणे आहे. वेळोवेळी विनंती अर्ज मागणी करूनही याबाबत सकारात्मक पाऊल उचलले जात नव्हते.
विरोधी पक्षनेता या नात्याने आम्ही वेळोवेळी प्रशासनाला धारेवर धरले, पालिका सभांतून हा मुद्दा उपस्थित केला, तसेच वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणांकडे दाद मागत यामागचे वास्तव निदर्शनास आणले. आज अखेर आयुक्त तथा संचालक कार्यालय नगर परिषद प्रशासन संचालनालयाने याबाबतचे आदेश पारित केले.
------