पंढरपुरातील अहिल्या पुलाखालील भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून प्रकाश बाबूराव माने (वय ३५, रा. चिंचोली भोसे, ता. पंढरपूर), सत्यवान धमेंद्र पवार (रा. चिंचोली भोसे, ता. पंढरपूर) व समाधान डहाळे (रा. वाखरी, ता. पंढरपूर) हे संगनमताने होडीमधून घेऊन जात होते. पोलिसांना बघून यातील व्यक्तींनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी ४० हजार रुपये किमतीची होडी फोडून नष्ट केली. त्याचबरोबर त्यातील ५५०० रुपये किमतीची वाळूने भरलेली ५५ पोती जप्त केली आहेत. याप्रकरणी पोकॉ. समाधान केरू माने यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोना. खंडागळे करत आहेत.
त्याचबरोबर माऊली दशरथ लोंडे (वय १९, रा. व्यासनारायण झोपडपट्टी, पंढरपूर) हे एम. एच. ०७ एफ ४२४५ या रिक्षामधून चंद्रभागा नदीपात्रातून शासनाच्या परवानगीशिवाय वाळू चोरी करून घेऊन जात होते. त्यामुळे पोलिसांनी त्याची १५ हजार रुपये किमतीची रिक्षा व २५०० हजार रुपये किमतीची २५ वाळूची पोती पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी माऊली लोंडे व ओंकार जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितली.