शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

उजनी जलाशय परिसरात बोटींवरील हॉटेलिंगला चालना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:16 AM

भीमानगर : उजनी धरण परिसरातील सौंदर्याचा फायदा करून घेण्यासाठी पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला. याठिकाणी बोटीवरील ...

भीमानगर : उजनी धरण परिसरातील सौंदर्याचा फायदा करून घेण्यासाठी पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला. याठिकाणी बोटीवरील हॉटेलिंग, पक्षी निरीक्षण केंद्र आणि उद्याननिर्मिती करण्याबाबतही चर्चा झाली.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उजनी धरणाला भेट देऊन बोटीतून पाहणी केली, तसेच उजनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चाही झाली. कोयना अन् तारकर्लीच्या धर्तीवर या ठिकाणी पर्यटन विकास होण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेतला गेला.

या बैठकीत आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, सोलापूर वन विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा वन अधिकारी धैर्यशील पाटील, माढा प्रांत अधिकारी ज्योती कदम, सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, जलपर्यटन तज्ज्ञ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे डॉ. सारंग कुलकर्णी, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, पाणस्थळ विकासचे सल्लागार तथा भारतीय वनसेवा अधिकारी जयंत कुलकर्णी, पक्षी निरीक्षक डॉ. व्यंकटेश मेतन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उबाळे, डॉ. प्राची मेहता, सचिन लोकरे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सारंग कुलकर्णी व जयंत कुलकर्णी यांनी उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाबाबत वेगवेगळ्या स्लाइड शोचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, रोजगारनिर्मिती व्हावी, गर्दी वाढावी, खाजगी उद्योग आणि रोजगार यांचा ताळमेळ घालून उजनी परिसराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी उजनी धरणावरील पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर डेव्हलप करणे गरजेचे आहे.

सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संजयमामा शिंदे आणि टीमसोबत बोटीमध्ये बसून पाहणी केली.

---

स्थानिकांना रोजगार मिळेल...

उजनी जलाशयावर वर्षभर वेगवेगळ्या खंडातून पक्षी येत असतात. यामुळेदेखील पर्यटन व्यवसाय वाढेल, तसेच राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरण असल्याने हॉटेलिंग व्यवसायही निसर्गरम्य वातावरणात नावारूपाला येईल. रोजगारात वाढ होईल व संबंधित विभागाला पर्यटनाच्या माध्यमातून महसूल गोळा होईल, असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

---

जागेबाबत लवकरच आराखडा

लवकरच उजनी धरण पर्यटन विकास समिती नेमून जागेची निवड केली जाईल. बाग अन् बोटिंगसाठी निश्चित स्थळाबाबतचा आराखडा फायनल केला जाईल, असे धरण व्यवस्थापन विभागाने सांगितले.

--

तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरील स्कुबा केंद्रांचीही इथे निर्मिती करता येऊ शकते. जलाशयात बुडालेली इतिहासजमा गावं पाहण्याचीही लोकांना उत्सुकता आहे. पाण्यातील मासे दर्शनही पर्यटकांना नक्कीच आवडेल.

- संजयमामा शिंदे

आमदार