याबाबत बेवारस मृत्यू म्हणून पौंंड पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद झाली आहे.
दीपक चव्हाण याचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील पौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना सापडल्यानंतर त्याचे फोटो व त्याच्याजवळ उपलब्ध असणारी काही माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर पोलिसांकडून टाकण्यात आली होती. ती फिरत फिरत लऊळच्या व कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या काही ग्रुपवर दिसून आली. त्यावेळी तो लऊळचा युवक असल्याची ओळख स्पष्ट झाल्यानंतर कुर्डूवाडी पोलिसांनी पौंड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक देवकर यांना याबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली.
व त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या नातेवाइकांना पुण्याला पाचारण करण्यात आले आहे. त्यांचे जाबजबाब घेण्याची प्रक्रिया सुरू असून दीपक चव्हाण याच्याजवळ ४ मार्च २०२१ रोजीचे कुर्डूवाडी ते शिवाजीनगर असा प्रवास केल्याचे एस.टी. तिकीट आढळून आले आहे. त्याचा खून झाला की कोणी अपघात केला व ही घटना नेमकी कोणत्या वेळेस झाली याचा पौंड पोलीस तपास करीत आहेत. अद्यापपर्यंत तर त्याची बेवारसपणे आकस्मिक मृत्यू अशीच नोंद पौंड पोलिसांत आहे. दीपक हा वाघ्या मुरळीच्या कार्यक्रमात काम करीत होता. पुण्याला त्याची एक बहीणही राहत आहे. लऊळ गावाकडे त्याची आई राहत आहे.
०६ दीपक चव्हाण