अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती मिताच बार्शी शहर पोलिसांनी त्याचा पंचनामा करून त्याचा तपास केला. तो मृतदेह बिभीषण सूर्यभान बागल (५५, ब्रह्मगाव, ता.परांडा) याचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर त्याच्या भावाने त्याला ओळखले. बार्शी पोलिसात भाऊ विष्णू सूर्यभान बागल यांनी तक्रार देताच पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विष्णू सूर्यभान बागल (रा. ब्रह्मगाव, तालुका परंडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत बिभीषण बागल हा १५ जून मंगळवारी रोजी दिवसभर शेतात मजुरीचे काम करून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतातील कामावरून पायी घराकडे येत होता. ढग पिंपरी फाटा येथे परांडा ते बार्शी येणाऱ्या रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिली. यामुळे बिभीषण वाहनाच्या खालील बाजूस अडकला. वाहनाने ढग पिंपरी फाटा (तालुका परंडा) येथून दोन लिंब उपळाई रोड बार्शी असे १९ किलोमीटर अंतरावर फरफटत नेले. येथे वाहनाच्या स्प्रीग पाट्याला अडकलेला मृतदेह पडून अज्ञात वाहन निघून गेले.
पोलिसांना या घटनेची खबर मिळताच सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार व त्यांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यायंनी दोन तासात तपास करून मयताच्या नातेवाइकांचा शोध घेऊन पुढील तपासासाठी परंडा पोलीस स्टेशनला हा गुन्हा वर्ग केला आहे.
----
हाता-पायाविना मृतदेह
- अज्ञात वाहनाच्या स्प्रींग पाट्यात बिभीषण बागल अडल्याने ढग पिंपरी फाटा (तालुका परंडा) येथून दोन लिंब उपळाई रोड बार्शी असा १९ किलोमीटर फरफटत प्रवास झाला. यात त्यांचे दोन्ही हात, पाय निकामी झाल्याचे पंचनामा करताना पोलिसांच्या निदर्शनास आले.