मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण मतदारांच्या तुलनेत ५२५५ मतदार वाढलेले दिसत आहेत. यासंदर्भात माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, अशोक गायकवाड, नागेश क्षीरसागर, सतीश बनसोडे, गौतम क्षीरसागर, दीपक तांबवे, सागर गाढवे आदींची नावे कमी करावीत, यासाठी हरकती नोंदवल्या होत्या. त्यानुसार या सुनावण्या सुरू झाल्या आहेत.
११ मार्च रोजी तहसीलदार बनसोडे, निवडणूक शाखाधिकारी राजशेखर लिंबारे यांच्या उपस्थितीत या सुनावण्या झाल्या.
दरम्यान, ११ रोजी काही हरकतदार उपस्थित राहिले. त्यामुळे अनुपस्थित हरकतदारांच्या त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सर्व्हे करून सुनावणी घेण्यात येणार असल्याचेही तहसीलदारांनी सांगितले.
चौकट
उपस्थित न राहिलेल्या मतदारांच्या वतीने ॲड. गौतम खरात यांनी यादीतील नावांबाबत नेमका काय आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबतची कागदपत्रे मिळावीत. त्या कागदपत्रांचे अवलोकन करून म्हणणे देण्यासाठी मुदत मिळावी, अशी मागणी केली आहे.