सोलापूर : दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोबाईल विक्रेत्यांनी आधारकार्ड शिवाय सिमकार्ड विक्री करू नये, याशिवाय बोगस सिमकार्ड विकेत्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर शहर गुन्हे शाखेने दिली.
सोलापूर शहर आयुक्तालयात शहरातील विविध कंपनीच्या सिमकार्ड विक्री व्यवस्थापक यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले, सहा़ पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे, दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन बंडगर यांनी मार्गदर्शन केले.
देशाची अंतर्गत सुरक्षा कायम ठेवण्यासाठी सिमकार्ड विक्रेत्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाºया सट्टाबाजाकडे अनेक सिमकार्ड मिळून आले होते त्यावरून असे सिमकार्ड विक्री करणाºयांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
या बैठकीस सोलापूर शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे दहशतवाद विरोधी कक्षाचे अधिकारी व सिमकार्ड कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते़