कुर्डूवाडी : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. युनिट नं.१ पिंपळनेर कारखान्याचा गाळप हंगाम २०२१-२२चा २१वा बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे व्हाइस चेअरमन वामनराव उबाळे यांचे हस्ते झाला.
यावेळी संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. बॉयलर प्रदीपन समारंभानिमित्त सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक संदीप पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी विद्याताई पाटील यांच्या हस्ते झाली.
विठ्ठलराव शिंदे कारखान्याने ऊस गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये १९ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे ३२ हजार ६९६ हेक्टर क्षेत्राची नोंद आहे. कारखान्याने प्रति दिन गाळप क्षमतेएवढा उसाचा पुरवठा होण्यासाठी आवश्यक यंत्रणेचे नियोजन केले आहे.
केंद्र शाससाने इथेनॉल उत्पादनास दिलेल्या प्रोत्साहनांतर्गत कारखान्याने सध्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची क्षमता ६० केएलपीडीवरून १५० केएलपीडीपर्यंत विस्तारवाढ केली आहे. कारखान्याने इन्सिनरेशन बॉयलरची उभारणी केली असल्याने, वर्षभर डिस्टिलरी प्रकल्प कार्यान्वित राहणार आहे. ४ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करून, ऑइल कंपन्यांना पुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे. या हंगामात कारखान्याचे ३८ मे.वॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ९.५० कोटी युनिट निर्यात होणे अपेक्षित आहे.
संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे. कारखान्याने अल्पावधीत गाळपक्षमता ११,००० मे.टन, ३८ मे.वॅट सहविजनिर्मिती प्रकल्प, डिस्टिलरी प्रकल्प १५० केएलपीडीपर्यंत विस्तारवाढ, प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित केल्याची माहीती व्हाइस चेअरमन वामनराव उबाळे यांनी दिली.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती तथा संचालक विक्रमसिंह शिंदे, शिवाजी डोके, रमेश येवले-पाटील, प्रभाकर कुटे, पांडुरंग घाडगे, वेताळ जाधव, लाला मोरे, लक्ष्मण खुपसे, सुरेश बागल, दीपक पाटील, कार्यकारी संचालक एस.एन. डिग्रजे, युनिट नं.२ चे जनरल मॅनेजर एस.आर. यादव, वर्क्स मॅनेजर सी.एस. भोगाडे, जनरल मॅनेजर पी.एस. येलपले, केन मॅनेजर एस.पी. थिटे, जनरल मॅनेजर पी.ए. थोरात, डिस्टिलरी मॅनेजर पी.व्ही. बागल, मुख्य शेतकी अधिकारी एस.एस. बंडगर, सिव्हिल इंजिनीअर एस.आर. शिंदे, सुरक्षा अधिकारी एफ.एम. दुंगे उपस्थित होते.
-----------
फोटो :