३५एकर क्षेत्रात व्यापलेल्या व बगॅस पासून प्लायवूड तयार करणाऱ्या या कंपनीतील ऑइल बॉयलरचे टेंपरेचर वाढल्याने किंवा शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे शेट्टी म्हणाले.
ज्या ठिकाणचा बॉयलरचा स्पोट झाला तेथे नेहमी सहा-सात कामगार काम करीत असतात परंतु शनिवारी कामगारांना सुटी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ऑईल बॉयलरचे टेंपरेचर वाढल्याने त्यातून पेटते ऑईल बाहेर पडले व जवळच असलेल्या बगॅसने पेट येऊन बॉयलरचा स्फोट झाला. त्यानंतर आग लागली. आग एवढी मोठी होती की धुराचे लोट टेंभुर्णीसह परिसरातील सहा-सात किमी अंतरावर दिसत होते.
आगीची खबर मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक भोसले आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून आग विजवण्यासाठी मदत केली. तसेच प्रहार संघटनेचे औद्योगिक सेलचे अध्यक्ष अमोल जगदाळे यांनी तात्काळ यांच्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून मदत केली .
-----
तर अख्खी कंपनी भस्मसात झाली असती
आग विझवण्यासाठी कंपनीतील यंत्रणेद्वारे व अग्निशामक दलाच्या गाड्या मागवून आग विझवण्यात आली. दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आग आटोक्यात आली नसती तर कंपनीच्या आवारात सर्व पसरलेल्या बगॅसने पेट घेऊन कंपनीच जळून खाक झाली असती.
----
एमआयडीसीत नाही एकही अग्निशामक वाहन
टेंभुर्णी एमआयडीसीमध्ये त्यांच्या मालकीची एकही अग्निशामक गाडी उपलब्ध नाही. ज्या-ज्या वेळी येथे आग लागते तेव्हा बाहेरून फायर ब्रिगेडच्या गाड्या मागवाव्या लागतात. टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये शासनाने कायमस्वरूपी दोन अग्निशामक दलाच्या गाड्या ठेवाव्यात अशी मागणी वारंवार करूनही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप प्रहार औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष अमोल जगदाळे
यांनी केला आहे.
फोटो ओळी : १३टेंभुर्णी-आग
पेट घेतलेला बाॅयलर