सोलापूरात जनहित शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलनसोलापूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नवीपेठ येथील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन झाले़ यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केल्या़ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ आष्टी तलावावरील सोडविण्यात आलेले डी़पी़ जोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी महाविरतणास त्वरीत आदेश द्यावेत, उजनी धरणाचे पाणी आष्टी तलावात त्वरीत सोडावे व ते पाणी आष्टी उपसासिंचन योजनेत सोडावे, बेजबाबदार व भ्रष्ट्र कार्यकारी अभियंता बिराजदार व जीवने यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे, पाटकुल पाटीजवळ मोहोळ-पंढरपूर रोडवरती अर्धवट कॅनॉलचे काम पूर्ण करण्यासाठी नवीन पुल बांधण्यात यावा, आष्टी उपसा जलसिंचन योजना १७ वर्षे रखडत पडलेली आहे़ सदर काम पूर्ण करून पोखरापूर तलावात पाणी सोडण्यात यावे यासह आदी मागण्यांबाबत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले़ यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते़
सोलापूरात जनहित शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन
By admin | Published: March 18, 2017 7:22 PM