सोलापूर :
वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू होणार असून वंदे भारतची पहिली गाडी रात्री पावणेअकरा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. अकरा फेब्रुवारीपासून सोलापूर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत मुंबईसाठी नियमित धावणार आहे. वंदे भारतसाठी सकाळी आठ वाजता तिकीट बुकिंगची सेवा सुरू झाली असून तिकीटचे दरही जाहीर झाले आहेत.
प्रतिकिलोमीटरसाठी दोन रुपये सोळा पैसे (एसी चेअर) इतके तिकिटाचे दर असणार आहे. सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना एसी चेअरसाठी ९८५ रुपये, तर एक्झिक्युटिव्ह चेअरसाठी १९९३ रुपये तिकिटाचे दर असणार आहे.
एक्झिक्युटिव्ह चेअरने प्रवास करणाऱ्यांना प्रतिकिमीसाठी ४ रुपये ३८ पैसे मोजावे लागतील. पुण्यासाठी तिकिटाचे दर ६८८ रुपये (एसी चेअर) असून एक्झिक्युटिव्ह चेअरसाठी १३८१ रुपये दर असणार आहे. मुंबई ते शिर्डीसाठी ८१८ रुपये (एसी चेअर), तर एक्झिक्युटिव्ह चेअरसाठी १६४८ रुपये दर असणार आहे. यासोबत ज्या प्रवाशांना केटरिंग सुविधा हवी आहे, त्यांना अतिरिक्त शुल्क देऊन खाद्यपदार्थ मागवता येते. तिकिटाच्या दरात पाच टक्के जीएसटीचा समावेश आहे.