दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 09:59 AM2024-11-06T09:59:33+5:302024-11-06T10:01:21+5:30

अवघ्या सात दिवसांवर कार्तिकी यात्रा आली तरी, देवाची शासकीय महापूजा कुणाच्या हस्ते करावी या संदर्भात विधि व न्याय विभागाकडून मार्गदर्शन लाभले नाही.

Both deputy chief ministers in the election Who will get the honor of pandharpur Vitthals Mahapuja | दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या

दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या

सचिन कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर |

Solapur Politics ( Marathi News ) : कार्तिकी यात्रा एकादशी सोहळा अवघ्या सात दिवसांवर आला आहे. मात्र सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेत, तर दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे यंदाच्या कार्तिकीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न होता, शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
  
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना तर कार्तिकी यात्रेनिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. सध्या राज्याला देवेंद्र फडणवीसअजित पवार असे दोन मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. फडणवीस व अजित पवार हे दोन्ही नेते निवडणूक लढवत आहेत, अशा व्यस्त कार्यक्रमातून हे वेळ काढून पंढरपूरला येतील का ? अचारसंहिता असल्याने त्यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करता येईल का ? असे प्रश्न समितीसमोर निर्माण झाले आहेत. यामुळे कार्तिकी यात्रेच्या शासकीय पूजेसंदर्भात समितीने विधि व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे. अवघ्या सात दिवसांवर कार्तिकी यात्रा आली तरी, देवाची शासकीय महापूजा कुणाच्या हस्ते करावी या संदर्भात विधि व न्याय विभागाकडून मार्गदर्शन लाभले नाही. यामुळे ऐन वेळेस अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा करावी लागणार असे चित्र निर्माण झाले आहे.

.. असे प्रसंग आले होते 

२०१६ साली कार्तिकी यात्रे दरम्यान नगर परिषदेची निवडणूक लागली होती. तेव्हा उपमुख्यमंत्री नसल्याने कार्तिकीच्या शासकीय महापूजेचा मान निवडणूक आयोगाच्या परवानगीने तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता. तर २०२० साली पदवीधर मतदार संघाची निवडणूकीची आचारसंहिता लागली होती. यावेळी आयोगाची परवानगी घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाचे शासकीय पूजा केली होते.

"सध्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. यामुळे कोणाच्या हस्ते कार्तिकी एकादशी दिवशी होणाऱ्या शासकीय महापूजेचा मान कोणाला द्यायचा याबाबत विधि व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागवले आहे. परंतु यासंदर्भात कोणताही लेखी आदेश आला नाही." - हभप गहिनीनाथ महाराज औसेकर सहअध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
 

Web Title: Both deputy chief ministers in the election Who will get the honor of pandharpur Vitthals Mahapuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.