ही फसवणुकीची घटना २०१७ ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडली आहे. बोगस डॉक्टर प्रदीप चतुर्भुज सुतार (रा. फुले प्लॉट, बार्शी) व मेहुणा बिभीषण अजिनाथ सुतार (रा. प्रकाशनगर, मिरज) अशी त्या फसवणूक केलेल्या संशयित आराेपींची नावे आहेत.
परमेश्वर सुतार यांच्या मुलाच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या असल्याचे नातेवाईक असलेल्या बोगस डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मेहुणे बिभीषण यांच्या मध्यस्थीने प्रदीप सुतार याने उपचारासाठी २ लाख ७० हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. परमेश्वर सुतार यांनी नातेवाईकांकडून १ लाख ७० हजार रुपये जमविले आणि ते पैसे मार्च २०१७ मध्ये प्रदीप सुतार यांच्याकडे दिले. बरेच दिवस शस्त्रक्रिया केली नाही. त्यानंतर परमेश्वर सुतार यांनी पैशाची मागणी केली. मात्र, उडवाउडवीचे उत्तर देऊन पैसे देणे टाळले. त्यानंतर हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराम शेळके करत आहेत.
.............
आधी डॉक्टर अन् आता पोलीस असल्याचे सांगितले
परमेश्वर सुतार यांनी शस्त्रक्रियेसाठी दिलेले पैसे परत मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. प्रदीप सुतार याने उलट मी डॉक्टर नसून मी पोलीस असल्याचे सांगून पैसे देत नाही. काय करावयाचे ते कर पुन्हा पैसे मागितले तर तुझे हातपाय तोंडीन, अशी दमदाटी केली.