पंढरपूर : छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयन राजे यांची नियुक्ती भाजपाने केली आहे. त्यामुळे ते त्यांचीच भाषा बोलत आहेत. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारली. माजी आमदार दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पवार पंढरपुरात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यात राष्टÑतती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर, ज्यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहातही कोणी गांभीर्यानेघेत नाही, असा टोला पवार यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीबाबत ते म्हणाले, राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. कृषी विधेयक येण्यापूर्वीही शेतकऱ्यांना त्यांचा माल इतर ठिकाणी विक्री करता येत होता. कृषी विधेयकाला सर्व स्तरातून विरोध होत आहे. सर्व मिळून या विधेयकाला विरोध करणार आहोत. याचे नेतृत्व कोणी एकटा न करताशेतकरी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.सीबीआयने काय दिवे लावले?अभिनेता सुशांतसिंहची आत्महत्या राहिली बाजूला आणि इतरच गोष्टी समोर येत आहेत. चौकशी करणाºया यंत्रणा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहेत का?, अशी शंका घेण्यासारखी अवस्था आहे. आम्ही वाचलं होतं की, एका कलाकाराने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते मात्र केंद्रसरकारचा त्यांच्यावर विश्वास दिसत नाही म्हणून त्यांनी हा तपास वेगळ््या एजन्सीकडे दिला. या एजन्सीने काय दिवे लावले त्याचा प्रकाश काही आम्हाला बघायला मिळालेला नाही, असेही पवार म्हणाले.