मंद्रुप: सासरच्या जाचाला कंटाळून मंद्रुप आणि कारकलमध्ये दोघींनी आत्महत्या केली. कारकल येथे बुधवारी सावित्री काशिनाथ उंबरजे हिने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नात राहिलेले हुंड्याचे पैसे घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत होता. या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली. रामलिंग कल्लप्पा बिराजदार (वय ४८ रा. कारकल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवरा काशिनाथ रेवप्पा उंबरजे, सासरा रेवप्पा शंकरप्पा उंबरजे, सासू श्रीदेवी रेवप्पा उंबरजे, नणंद सुप्रिया सागर म्हमाणे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.मंद्रुप येथे सासरच्या लोकांनी माहेरहून टमटम आणायला पैसे दिले नाहीत. म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला म्हणून अश्विनी बरगालसिद्ध पडोळे (वय २१) हिला रॉकेल ओतून पेटविल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ती १०० टक्के भाजल्याने जागीच मरण पावली. वर्षापूर्वी तिचे बरगालसिद्ध धर्मण्णा पडोळे हिच्याशी लग्न झाले होते. संगीता बनसिद्ध देशमुख यांच्या फिर्यादीनुसार पती बरगालसिद्ध धर्मण्णा पडोळे, सासू सुगलाताई, सासरा धर्मण्णा, दीर शिवाजी, सासू कुशाल भैरप्पा कोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. तपास प्रकाश रासकर करीत आहेत.
मंद्रुप व कारकलमध्ये दोघींची आत्महत्या
By admin | Published: June 06, 2014 1:21 AM