कोरोना महामारीला रोखण्यासाठी गावात सर्वप्रथम कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केली. मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्स राखणे, कट्ट्यावर न बसणे, बाहेरगावचा माणूस गावात येऊ न देणे, नागरिकांनी बाहेरगावी कार्यक्रमासाठी जाऊ नये, असे नियम गावाने केले होते. नागरिकांनी या सर्व नियमांचे पालन केल्यामुळे कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यश मिळवले आहे.
कोरोना महामारीला रोखण्यात ग्रामसेवक पृथ्वीराज रजपूत, आशा वर्कर मीरा खांडेकर, अंगणवाडी सेविका नंदा खांडेकर, चतुरा खांडेकर, पोलीसपाटील सुवर्ण लता पाटील, शिक्षक सदाशिव सुरवसे, विश्वास शेंडगे, डॉ. शंकर झेंडे, जे. आर. शेख, भाऊ खांडेकर, उमेश वाघ, दिलीप खांडेकर, बळीराम सुसलादे, परमेश्वर नवले, भिवा खांडेकर यांनी परिश्रम घेतले.
---
गावातील नागरिकांनी कोरोना आपती व्यवस्थापन समितीचे काटेकोर पालन केले तसेच मास्क वापरणे, विनाकारण बाहेरगावी न फिरणे, मोजक्याच माणसांत धार्मिक कार्यक्रम, लग्न कार्ये करणे असे नियमांचे केल्यामुळे कोरोनाला गावाच्या वेशीबाहेर रोखले.
-पृथ्वीराज रजपूत, ग्रामसेवक, मनगोळी.
---
गावातील नागरिकांची एकी, आरोग्य अधिकारी डॉ. अरूण पाथरूट, डॉ. किरण बंडगर यांनी वेळावेळी केलेले मार्गदर्शन तसेच वाडी - वस्त्यांवर जाऊन दररोज जनजागृती केल्यामुळेच आम्ही कोरोनाला गावच्या वेशीबाहेर रोखण्यात यश मिळवले.
-मीरा खांडेकर, आशा वर्कर
---