शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सैराटमधील विहिरीनं गाठला तळ, वाळलेल्या झाडाचीही तुटली फांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:31 PM

यंदाच्या सरलेल्या मान्सूनमध्ये करमाळा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाने  तालुक्यात रौद्ररूप धारण करावयास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देझाड कोसळण्याची भीती, तरीही सेल्फीची क्रेझ कायम करमाळा तालुक्यातील देवळाली, श्रीदेवीचा माळ ओसाड

नासीर कबीर 

करमाळा : सैराट सिनेमात अख्ख्या महाराष्ट्रातील सिनेरसिकांनी पाहिलेली करमाळा तालुक्यातील देवळाली गावशिवारातील विहिरीने दुष्काळाच्या भीषण टंचाईत तळ गाठलेला आहे. सैराट चित्रपटातीलच श्रीदेवीचामाळ येथील वाळलेल्या झाडाची एक फांदी तुटली आहे. झाड केव्हा कोसळेल याचा नेम राहिलेला नाही.

मराठी चित्रपटसृष्टीत सिनेरसिकांनी डोक्यावर घेतलेला व कोटीचे उड्डाणे पार करणाºया सैराट चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक नागराज मंजुळे करमाळ्यातील जेऊर गावचे रहिवासी आहेत. त्यांचे संपूर्ण बालपण करमाळा शहरात, तर वास्तव्य जेऊर येथे असल्याने पिस्तूल्या लघुपटानंतर गाजलेला फॅन्ड्री सिनेमा काढल्यानंतर नागराजने करमाळा तालुक्याच्या मातीत सैराट चित्रपटाचे केम, कंदर, वांगी, कुगाव, करमाळा, देवळाली, श्रीदेवीचामाळ, मौलालीमाळ या ठिकाणी शूटिंग केले. सैराटने लोकप्रियता मिळवली. मराठी सिनेजगतात ऐतिहासिक कोटीचा टप्पा पार केला. सैराट प्रदर्शित होऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे.

सैराट सिनेमाबरोबर करमाळा तालुक्याचा परिचय राज्यात व देशात झाला. सैराट चित्रपटात असलेला करमाळा तालुक्यातील कंदर येथील शंकरराव भांगे यांचा बंगला, श्रीदेवीचामाळ येथील महाकाय विहीर, वाळलेले झाड, करमाळा बसस्थानक, किल्ला, कुगाव येथील उजनी धरणातील इनामदार यांचा पडलेला वाडा, देवळाली येथील धर्मराज राखंडे यांची विहीर, जेऊर येथील नागराज मंजुळेंचे पत्र्याचे घर या सिनेमात चित्रित केलेली ठिकाणे पाहण्यासाठी आजही राज्यभरातून सिनेरसिक येतात व सेल्फी  काढून जातात.

यंदाच्या सरलेल्या मान्सूनमध्ये करमाळा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाने  तालुक्यात रौद्ररूप धारण करावयास सुरुवात केली आहे. सैराट सिनेमात नागराज मंजुळे यांनी देवळाली येथील भास्कर राखुंडे यांच्या पुरातन पाण्याने भरलेल्या विहिरीचे चित्रीकरण केले होते. या विहिरीत परशा, आर्ची, लंगड्या व मंग्या उड्या मारून पोहत असलेल्या विहिरीने सध्या तळ गाठलेला आहे. राखुंडे वस्तीवर सर्वांची तहान भागवणाºया या विहिरीचे पाणी तळाला जाऊन पोहोचले आहे, तर सैराट चित्रपटातील  श्रीदेवीचामाळ येथील वाळलेले झाड नामशेष होऊ लागले आहे.

 सैराट सिनेमात त्या वाळलेल्या झाडावर एका फांदीवर आर्ची व दुसºया फांदीवर परशा बसून संवाद करतात.  ते वाळलेले झाड राज्यातील लाखो प्रेक्षकांनी येथे येऊन पाहिलेले असून आर्ची-परशा ज्याप्रमाणे वाळलेल्या झाडावर बसले. त्याप्रमाणेच या वाळलेल्या झाडावर चढून बसण्याचा मोह लाखो युवक-युवतींना आवरलेला नाही. यामुळे त्या वाळलेल्या झाडाची सैराटमधील आर्ची ज्या फांदीवर बसून संवाद करते, ती फांदीच आता तुटलेली असून, संपूर्ण झाडच धोकादायक बनले असून, ते कधी पडेल याचा नेम राहिलेला नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरSairat 2 Movieसैराट 2Nagraj Manjuleनागराज मंजुळेagricultureशेती