३१ डिसेंबर रोजी किसन दिनकर साळुंखे या शेतकऱ्याने जिल्हा बँकेच्या चांदज शाखेतून ८५ हजार रुपये काढले होते. काढलेले पैसे गडबडीत पिशवीत ठेवताना त्यातील ५० हजार रुपये बँकेतच पडले होते. शाखाधिकारी तांबे यांना बँकेचे कामकाज चालू असताना ते सापडले, त्यांनी उचलून ठेवले व कामकाज संपल्यानंतर बँकेतील कॅश मोजली तेव्हा त्यांना ५० हजार रुपये वाढल्याचे आढळून आले; परंतु हे ५० हजार कोणाचे याची खातरजमा न झाल्याने त्यांनी ती रक्कम बाजूला ठेवली.
१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता किसन दिनकर साळुंखे यांनी बँकेत येऊन चौकशी केली व माझे काल ५० हजार पडल्याचे सांगितले, तेव्हा शाखाधिकारी श्यामसुंदर तांबे यांनी खातरजमा करून साळुंखे यांची ५० हजार रुपयांची रक्कम सुपूर्त केली. यावेळी शिवाजी पाटील, माजी सरपंच रामचंद्र टकले, बँकेचे कर्मचारी ए. आर. तांबे, व्ही. एच. निचाळ व खातेदार उपस्थित होते.
फोटो
०२टेंभुर्णी०१
ओळी
ग्राहकाची ५० हजार रुपयांची रक्कम परत देताना शाखाधिकारी श्यामसुंदर तांबे.