शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

Breaking; ऊसाच्या फडात गांजाची लागवड; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By appasaheb.patil | Published: July 22, 2022 10:31 AM

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

सोलापूर : वटवटे (ता. मोहोळ) येथील एका शेतातील ऊसाच्या पिकामध्ये केलेली गांजाची लागवड पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांच्या कारवाईत ४.१३ किलो वजनाचे गांजासह एकूण ४ लाख ४१ हजार ३०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना सोलापूर जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी विषेश मोहिम राबवून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि अनिल सनगल्ले यांचे विशेष पथक नेमूण सदर पथकास कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कार्यालयात हजर असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, मौजे वटवटे (ता. मोहोळ जि. सोलापूर) येथील शेतकरी आपल्या शेतातील ऊसाच्या पिकामध्ये गांजा सदृष्य वनस्पतीची लागवड केले असलेबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या बातमी प्रमाणे कारवाई करण्याकरिता वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कारवाई करणेकामी कामती पोलीस ठाणे येथे जावून तेथील प्रभारी अधिकारी सपोनि अंकुश माने व कामती पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांची मदत घेवून  कारवाई करणेकरीता बातमीचे नमूद ठिकाणी नायब तहसिलदार लिना खरात, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा असे वाहनासह जावून बातमीप्रमाणे शेतातील ऊसामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार यांचेसह पाहणी केली असता शेतातील ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी लहान मोठी गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. त्यावरून मिळून आलेली झाडे ही गांजा सदृश्य वनस्पती असल्याचे खात्री झाल्याने सदरची झाडे मुळासह उपटून काढून त्याचे सोबत आणलेल्या वजनकाटयामध्ये वजन केले असता ४५.१३० किलो वजनाचे ४,४१,३०० रू. किंमतीचे गांजा सदृश्य वनस्पती मिळून आले.

अंमली पदार्थ गुन्हयाचेकामी कामती पोलीस ठाणेचे सपोनि अंकुश माने यांनी जप्त करून कारवाई केली आहे. सदरबाबत कामती पोलीस ठाणे येथे गुरंन 195/2022, अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हयाचा तपास कामती पोलीस ठाणेचे सपोनि अंकुश माने हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली कामती पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक अंकुश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस  निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, मोहिनी भोगे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख, कामती पोलीस ठाणेचे बापूसाहेब दुधे, चंद्रकांत कदम, सचिन जाधवर, अमोल नायकोडे, परमेश्वर जाधव, भरत चैधरी यांनी बजावली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी