मंगळवेढा : जिल्हा परिषद शाळा, ढवळस येथे क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी दारू पिवून एकमेकांच्या जवळ येवून एकमेकांच्या खांदयावर हात टाकून तोंडास मास्क न लावता स्वतःचे व इतरांचे आरोग्यास हानी पोहोचेल असे कृत्य केल्याप्रकरणी दिगंबर आत्माराम गायकवाड, संग्राम मच्छिंद्र गायकवाड, अमोल गोरख गायकवाड, धनाजी चंद्रकांत जाधव (सर्व रा.ढवळस) या चौघांविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शाळा ढवळस येथे दि. २३ रोजी वरील चार आरोपीनी दुपारी २ वाजता दारू पिवून येवून एकमेकांचे जवळ खांद्यावर हात टाकून एकत्र गप्पा मारत बसले होते. आरोपीनी कोणत्याही प्रकारचा तोंडास मास्क लावलेला नव्हता, साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाणीव असतानाही बेदकारपणे मानवी जीवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल व संसर्ग पसरविण्याचे घातकी कृत्य करून वरील आरोपीने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे ढवळस येथील तलाठी वंदना मुकूंद गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.