सोलापूर - केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संयुक्त कामगार समिती तर्फे शुक्रवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले. भारत बंदच्या आंदोलनात सहभागी झालेल्या माकपच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी पूनम गेट येथून उचलले.
यात माजी आमदार नरसय्या आडम यांचा समावेश आहे. सदर बाजार पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलन ठिकाणी पोलिस आणि माकपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.