सोलापूर : एऩ टी़ पी़ सी. येथील ब्रेक दिलेल्या प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगारांना लवकरात लवकर कामावर रुजू करून घेण्याची मागणी तिरंगा विकास संस्था, फताटेवाडी येथील बालेसाब मुल्ला यांनी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे असलेल्या एऩटी़पी़सी. प्रकल्पातील बºयाच कामगारांना मागील काही महिन्यांपासून ब्रेक देण्यात आला आहे़ याशिवाय स्थानिक व प्रकल्पग्रस्त कामगारांना कामावरून काढून टाकले आहे़ या कामगारांना कामावर घ्यावे, यासाठी बालेसाब मुल्ला यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांना याबाबतची माहिती घेऊन कामगारांना न्याय द्यावा, अशा सूचना केल्या होत्या़ त्यानुसार उपविभागीय अधिकाºयांनी १९ जानेवारी २०१९ रोजी एऩटी़पी़सी. अधिकारी, तहसीलदार व कामगार यांच्यात बैठक झाली़ या बैठकीत एनटीपीसीने कामगारांना आम्ही काढून टाकले नाही तर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरने काढल्याची माहिती दिली़ यानंतर उपविभागीय अधिकारी पाटील यांनी एनटीपीसीच्या संबंधित अधिकाºयांना कामगारांच्या सर्व कागदपत्रांसह अन्य पुरावे घेऊन दुसºया बैठकीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या़ ठरल्याप्रमाणे दुसरी बैठक ४ फेबु्रवारी २०१९ रोजी घेतली, मात्र या बैठकीला एनटीपीसीच्या अधिकाºयांनी दांडी मारली़ त्यानंतर तिसºया बैठकीचे आयोजन केले़ तिसरी बैठक ५ मार्च २०१९ रोजी घेतली, मात्र याही बैठकीला एनटीपीसीच्या अधिकाºयांनी गैरहजेरी लावली़ त्यामुळे संतप्त झालेल्या उपविभागीय अधिकाºयांनी पुढील बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत घेऊ, असे आश्वासन कामगार संघटनेला दिले.
अन्यथा आंदोलन करणार- कामगारांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध बैठकीला एनटीपीसीच्या संबंधित अधिकाºयांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे कामगारांचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. हा प्रश्न येत्या काही दिवसात सोडविला गेला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तिरंगा विकास संस्थेचे अध्यक्ष बालेसाब मुल्ला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़