शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

उष्माघातानं घायाळ घारीनं घेतला मोकळा श्वास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:05 PM

प्राणीमित्रांची मदत; वीस दिवसांनंतर घारीची प्रकृती झाली ठणठणीत

ठळक मुद्देप्राणी संग्रहालयात तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली उपचार सुरू होतेअन्नपाण्याविना तिला अशक्तपणा आल्यामुळे तिची ही स्थिती झाल्याचा निष्कर्ष डॉ. नितीन गोटे, डॉ. भरत शिंदे यांनी काढला

सोलापूर: रंगभवनजवळील आयकर नगरात उष्माघातामुळे घायाळ अवस्थेत सापडलेल्या घारीला उपचार करून वीस दिवसांनंतर मंगळवारी प्राणीमित्रांच्या मदतीने निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आलं. प्राणी संग्रहालयात तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली उपचार सुरू होते.

वीस दिवसांपूर्वी आयकर नगर येथून एका महिलेचा दुपारच्यावेळी वन्यजीवप्रेमी संस्थेच्या सदस्यांना मोबाईलवर कॉल आला. या परिसरात एक मोठा पक्षी घायाळ अवस्थेत पडला असल्याचे सांगण्यात आले. लागलीच प्रवीण जेऊरे व निकंदन जंगम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता घार क्षीण अवस्थेत तडफडत असल्याचे आढळून आले. तिच्यावर प्राथमिक उपचार करून प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. वाढत्या तापमानामुळे ती चक्कर येऊन खाली पडली. अन्नपाण्याविना तिला अशक्तपणा आल्यामुळे तिची ही स्थिती झाल्याचा निष्कर्ष डॉ. नितीन गोटे, डॉ. भरत शिंदे यांनी काढला. 

अशक्तपणामुळे तिला धड उडताही येत नव्हते. अशा स्थितीत तिला निसर्गाच्या सान्निध्यात सोडणे धोक्याचे ठरेल म्हणून प्राणी संग्रहालयामध्ये ठेवण्यात आले. पहिल्या दिवशी स्वत:हून खाद्यही खाता येत नव्हते. वन्यजीवप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी साखर पाणी, गुलकोज पाजवले. त्यानंतर दोन दिवस तिच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सदस्यांनी जबरदस्तीनं मांसाहार खाऊ घातला. तिच्या सुरक्षेसाठी मोठ्या पिंजºयात तिची रवानगी करण्यात आली. दोन दिवसांनंतर ताजेतवाने झाल्यानंतर ती स्वत:हून खाऊ लागली. दररोज भरपेट खाद्य दिल्याने हळूहळू तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली. १५ दिवसांनंतर ती पिंजºयामध्येही उडू लागली. तिच्या पंखामध्ये बळ आल्याचे डॉ. गोटे आणि डॉ. शिंदे यांच्या लक्षात आले. आणखी पाच दिवस तिला ठेवण्यात आले. वीस दिवसांनंतर मंगळवारी २३ एप्रिल रोजी ती जिथे सापडली होती त्या आयकर नगर येथेच नेऊन निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. 

या उपक्रमासाठी वन्यजीवप्रेमी संस्थेचे मुकुंद शेटे, प्रवीण जेऊरे, निकंदन जंगम यांच्यासह सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच उष्माघाताने बळी जाऊ पाहणाºया घारीला जीवदान मिळाले. 

...तर गतप्राण झाली असती- आयकर नगर परिसरात उष्माघातानं भोवळ येऊन घार पडली असल्याचे या परिसरातून एका महिलेचा फोन आल्यामुळे वन्यजीवप्रेमी सदस्य तातडीने धावले. तिच्यावर वेळीच डॉक्टरांकडून योग्य उपचार करण्यात आले. यामुळे तिच्या पंखात बळ येऊन नव्याने जगण्याची ऊर्मी तिच्यामध्ये निर्माण झाली. याकडे कोणीच लक्ष दिले नसते, काही काळानंतर ती गत्प्राण झाली असती, अशी प्रतिक्रिया पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात