पंढरपूर : प्रलंबित महसूल दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने दिल्याबद्दल बक्षीस स्वरुपात एकाच्या मार्फात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया अव्वल कारकुनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले आहे. पंकज अर्जुन राठोड (वय ३२ वर्षे, अव्वल कारकून, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर जि. सोलापूर) व निलेश राजू गंगथडे, (वय २६ वर्षे, खाजगी इसम, शिवाजी चौक, पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्यावर तलाठी कार्यालयात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे असलेल्या जमिनीबाबत प्रांताधिकारी कार्यालय, पंढरपूर यांच्याकडे महसूली दावा प्रलंबित होता. त्या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने दिला होता. त्या निकालाचे केलेल्या कामाचे बक्षीस व निकालाच्या प्रती देण्यासाठी १ जुलै २०१३ रोजी पडताळणी मध्ये २ हजार रुपये घेतले होते. व त्यानंतर लावण्यात आलेल्या सापळ्यात अधिक ३ हजार रुपये असे एकूण ५ हजार रुपयांची लाच मागणी करून ती निलेश राजू गंगथडे, (वय २६ वर्षे, खाजगी इसम, शिवाजी चौक, पंढरपूर, जि. सोलापूर) च्या मार्फत सोमवारी (८ जुलै २०१९) रोजी स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक अजितकुमार जाधव, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस उपनिरीक्षक निलकंठ जाधव, पोलीस नाईक अर्चना स्वामी, पोलीस कॉस्टेबल उमेश पवार, चालक शाम सुरवसे यांनी केली आहे.