शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

बेगमपूर येथील पुल वाहतुकीसाठी खुला; कोल्हापूर- सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 7:21 PM

आठ तास  दुरुस्तीचे होते काम सुरू  ; सर्व तपासण्या पूर्ण

मंगळवेढा : भीमा नदीला आलेल्या महापुराने तब्बल चार दिवस बंद असलेल्या मंगळवेढा--सोलापूर महामार्गावरील बेगमपुर पूल रविवारी सायंकाळी पाच वाजता पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

दरम्यान हा पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा यासाठी महामार्ग अधिकारी व महसूल, पोलीस प्रशासनाचे  अधिकारी आठ तास तळ ठोकून होते . उखडलेला रस्ता दुरुस्ती व सुरक्षा पाईप बसविल्यानंतर सर्व तपासण्या पूर्ण झाल्यावर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे.

बेगमपुर-माचणूर पुलावरील पाणी रविवारी पहाटे  पूर्णतः ओसरले होते मात्र या महापुरात पुलावरील सुरक्षा कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले  तसेच सुरक्षा पाईप ही तुटून वाहून गेल्या होत्या . पुराच्या पाण्याच्या  मोठ्या दाबाने रस्ता  उखडला होता  रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. यासाठी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी संपूर्ण तपासणी करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले होते.

प्रारंभी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची दुरावस्था पहिली त्यानंतर त्यांनी पुलाच्या सुरक्षा पाईप बसविणे व उखडलेला रस्त्याची तात्काळ दुरुस्ती केली पोकलेन मशीन व डंपर चे तब्बल आठ  तास काम सुरू होते.

सकाळी १० वाजल्यापासून सुरू असलेले काम सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते. सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर हा पूल अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला महसूल , पोलीस व महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी मोठे परिश्रम घेतले. 

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरRainपाऊस