आप्पासाहेब पाटील, सोलापूर : बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून राखीपोर्णिमा सर्वत्र साजरी केली जाते. बहिण भावाला ओवाळून राखी बांधते. ही राखी म्हणजे भावाने बहिणीला दिलेले सुरक्षिततेच आणि शुद्ध प्रेमाचे आश्रयान आहे. असाच एक अनोखा कार्यक्रम बुधवारी सोलापुरातील जिल्हा कारागृहात पहावयास मिळाला. मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीनं जिल्हा कारागृहात रक्षाबंधनक कार्यक्रम घेण्यात आला. याचवेळी कारागृहात ब्रिगेडनं कैद्यांना राख्या बांधल्या.
यावेळी कारागृह अधिकारी मिंड तसेच उपअधीक्षक प्रदीप बाबर, आगणवे हेही उपस्थित होते. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, जावेद बद्दी, राजू हुंडेकरी, आशा मराठी विद्यालयच्या विद्यार्थ्यीनींच्या हस्ते कैदी बंदिना राखी बांधण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापिका तस्लिम पठाण, तैसिन सय्यद, असिफ बडेघर, सिध्दू निंबाळ आदी उपस्थित होते. या प्रसंगी शहराध्यक्ष मतीन बागवान, राम गायकवाड यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
माणूस जन्मता गुन्हेगार नसतो, आपल्या हातून नकळत झालेली शिक्षा आपण भोगत आहात, यापुढे आपण एक चांगला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आपण करा समाजातील वाईट पणा संपवा असे मत हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.