माढा तालुक्यातील भुईंजे येथे संत रविदास महाराज यांच्या ६४४ व्या जयंती निमित्त आयोजत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संत रविदास महाराज मंदिराचे मुख्य प्रवर्तक राजाभाऊ शिंदे यांनी अरदास, आरती म्हटली. व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते रविदास महाराज यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली तर वैभव कुटे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी कोकाटे म्हणाले की,रविदास महाराज हेही संत नामदेवांप्रमाणे शीख धर्मीयांवर प्रभाव टाकणारे समर्थशाली, प्रभावी व्यक्तिमत्व होते. त्यांनी मानसिक गुलामगिरीतुन शूद्रादी-अतिशूद्रांना मुक्त करण्याचे महान कार्य केले. अशा लोकांना वर्ण व्यवस्थेने ज्ञानाचा अधिकार नाकारलेला होता. यामुळे त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याचे कार्य केले. भुईंजे येथील रविदास मंदिर संत रविदास महाराज यांच्या साहित्याचे अभ्यास केंद्र व्हावे ही संकल्पना कोकाटे यांनी यावेळी मांडली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजा बोबडे, कैलास सातपुते, महेंद्र वाकसे, महादेव गायकवाड, सरपंच अजिनाथ कांबळे, कृषी अधिकारी अनिल कांबळे, नागनाथ शिंदे, रत्नमाला शिंदे, संजीवनी अरबोळे, किरण लोंढे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी: भुईंजे (ता. माढा) येथे संत रविदास जयंतीनिमित्त कार्यक्रमात व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचा सत्कार करताना कैलास सातपुते, रामभाऊ शिंदे.
---